MyCurrentAffairs.com • Competitive Exam Prep
1.
'लीळाचरित्र' या मराठी भाषेतील एका प्रसिद्ध आद्यग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?
केशवदेव व्यास
भीष्माचार्य
म्हाइंभट्ट
मुकुंदराज
2.
'सिंह' या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान होतो ?
संगत
पतंग
संशय
श्रीखंड
3.
गाळलेल्या जागी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
दोन सजातीय स्वर एकत्र येऊन एक _______ निर्माण होतो / होते.
ऱ्हस्व स्वर
संयुक्त स्वर
दीर्घ स्वर
संयुक्त व्यंजन
4.
'मनश्चक्षू' या शब्दातील योग्य संधी स्पष्ट करा.
मानस + चक्षु
मनाश + चक्षु
मनस + चक्षु
मनः + चक्षु
5.
दिलेल्या पर्यायातून 'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम असणारा पर्याय निवडा.
भोळे
भोळेपणा
भोळी
भोळसर
6.
दिलेल्या पर्यायातून 'हंस' या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द निवडा.
हंसी
हंसिका
हंसोण
हंसा
7.
'शाळेत वेळेवर यावे' या वाक्यातील 'शाळेत' या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ दिलेल्या पर्यायातून ओळखा.
संबोधन
कर्ता
संबंध
अधिकरण
8.
'अनिताने सुनीताला दोन रुपये दिले.' या वाक्यातील 'दोन' या शब्दाची जात दिलेल्या पर्यायातून निवडा.
क्रियापद
कर्म
विशेषण
सर्वनाम
9.
'स्वतःशीच केलेले भाषण' या शब्दसमूहासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.
संभाषण
स्वगत
चिंतन
स्वभाषण
10.
'विधायक' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.
प्रगतशील
सरळसकट
तेजोमय
विघातक