• युनेस्कोमार्फत 'ऐतिहासिक शहरी लँडस्केप प्रकल्प (Historic Urban Landscape Project)' अंतर्गत मध्य प्रदेश राज्यातील ओरछा आणि ग्वाल्हेर या शहरांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्रकल्प हा २०११ मध्ये सुरू करण्यात आला होता.

  • सदर प्रकल्पाचे अनावरण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

  • वाराणसी आणि अजमेर या भारतातील शहरांसह दक्षिण आशियातील ६ शहरे या प्रकल्पात अगोदरपासून सहभागी असून ग्वाल्हेर आणि ओरछाचा ७ व्या आणि ८ व्या क्रमांकाची शहरे म्हणून समावेश करण्यात आला आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: मंगूभाई छगनभाई पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.