-
भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्यामार्फत नुकतेच 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार (Swachh Survekshan Awards)' २०२१ प्रदान करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
-
यंदाची २०२१ सालची ही स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची ६ वी आवृत्ती आहे
-
इंदौर पुन्हा एकदा सलग ५ व्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
-
सुरत (गुजरात) दुसऱ्या स्थानावर तर विजयवाडा (आंध्र प्रदेश) तिसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहेत.
पुरस्कार विजेत्यांची यादी
-
सर्वात स्वच्छ शहर: इंदौर
-
सर्वात स्वच्छ गंगा शहर: वाराणसी
-
सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड: अहमदाबाद कॅन्टोन्मेंट
-
सर्वात स्वच्छ जिल्हा: सुरत
-
सर्वात वेगवान प्रवास करणारे छोटे शहर: होशंगवाड (मध्य प्रदेश)
-
नागरिकांच्या प्रतिसादामधील सर्वोत्कृष्ट लहान शहर: त्रिपुटी (महाराष्ट्र)
-
सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजमधील अव्वल शहर: नवी मुंबई
-
सर्वात स्वच्छ राज्य (१०० हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसह): छत्तीसगड
-
सर्वात स्वच्छ राज्य (१०० पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसह): झारखंड
-
सर्वात स्वच्छ शहर (१ लाखापेक्षा कमी लोकसंख्या): विटा (महाराष्ट्र)
-
सर्वात स्वच्छ छोटे शहर (१-३ लाख लोकसंख्या): नवी दिल्ली नगर परिषद
-
सर्वात स्वच्छ मध्यम शहर (३-१० लाख लोकसंख्या): नोएडा
-
सर्वात स्वच्छ मोठे शहर (१०-४० लाख लोकसंख्या): नवी मुंबई




