-
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला आहे की मुलींचा आपल्या पित्याच्या मालमत्तेवर मुलांइतकाच हक्क आहे.
ठळक मुद्दे
-
सदर न्यायालयीन निर्णयामध्ये असे म्हटले आहे की मुलींचा आपल्या पित्याच्या मालमत्तेवर मुलांइतकाच हक्क आहे.
-
हिंदू वारसा (दुरुस्ती) अधिनियम, २००५ लागू होण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनांचाही यात समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २८ जानेवारी १९५० रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'यतो धर्मस्ततो जयः' हे सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य आहे.