• डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत भारतातील पहिल्या 'IndiGau' नावाच्या गुरांसाठीच्या जीनोमिक चिपचे () अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • देशी पशूंच्या शुद्ध जातींच्या संवर्धनासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • 'राष्ट्रीय पशु जैवतंत्रज्ञान संस्थेच्या (National Institute of Animal Biotechnology - NAIB)' शास्त्रज्ञांमार्फत सदर चिप विकसित करण्यात आली आहे.

  • पशु जातींचे संवर्धन करणे तसेच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर चिपचे अनावरण करण्यात आले आहे.