
-
हिमाचल प्रदेश पोलीसांचा नुकताच ‘प्रेसिडेंट्स कलर (President’s Colour)’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
राज्य पोलिसांच्या वतीने पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी सदर पुरस्कार स्वीकारला आहे.
-
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर तर मुख्यमंत्री श्री. जयराम ठाकूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
-
सदर सन्मान मिळवणारे हिमाचल प्रदेश पोलीस हे भारतातील ८ वे राज्य पोलीस दल ठरले आहे.
हिमाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे सध्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: जय राम ठाकूर हे सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्र शासित प्रदेश म्हणून स्थापना तर २५ जानेवारी १९७१ रोजी राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: शिमला ही हिमाचल प्रदेशची उन्हाळी तर धरमशाला ही हिंवाळी राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिमाचल प्रदेश राज्याचा देशात १७ वा क्रमांक लागतो.