• 'प्रोफेशनल वेल्थ मॅनेजमेंट (Professional Wealth Management - PWM)' मार्फत एका आभासी समारंभात आयोजित करण्यात आलेल्या 'ग्लोबल प्रायव्हेट बँकिंग अवॉर्ड्स (Global Private Banking Awards)' २०२१ मध्ये HDFC बँकेला भारतातील 'सर्वोत्कृष्ट खाजगी बँक' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • PWM हे फायनान्शियल टाईम्स ग्रुपतर्फे प्रकाशित करण्यात आलेले संपत्ती व्यवस्थापन मासिक आहे.

HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.

  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: अतनू चक्रवर्ती हे बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: शशीधर जगदीशन हे बँकेच्या या पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.

  • बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.