-
केंद्रामार्फत नुकताच बिहारच्या मिथिला मखानाला GI टॅग जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत भौगोलिक निर्देशांक नोंदणीमार्फत (Geographical Indications Registry - GIR) सदर घोषणा करण्यात आली आहे.
जीआय (Geographical Indication - GI) टॅग बाबत महत्वपूर्ण माहिती
-
भारतातील भौगोलिक निर्देशांक नोंदणी ही 'वस्तूंची भौगोलिक नोंदणी आणि संरक्षण अधिनियम (Geographical Indications of Goods (Registration and Protection Act), १९९९' द्वारे केली जाते जी सप्टेंबर २००३ पासून अंमलात आणली गेली.
-
GI टॅगमुळे उत्पादनांचा बेकायदेशीर वापर होण्यापासून संरक्षण मिळते आणि स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा होतो.
-
भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयाचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडू येथे आहे.