• 'चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल (Cherry Blossom Festival)' २०२१ नुकताच मेघालयमध्ये साजरा करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर ३ दिवसीय फेस्टिव्हल २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला.

  • त्याचे उद्घाटन मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के. संगमा आणि जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी यांच्या हस्ते करण्यात आले.

मेघालय राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: कॉनराड संगमा हे सध्या मेघालय राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: शिलॉंग ही मेघालय राज्याची राजधानी आहे.