-
नुकतेच 'सर्वोत्कृष्ट FIFA फुटबॉल पुरस्कार (The Best FIFA Football Awards)' २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
फुटबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी झुरिच, स्वित्झर्लंड येथे सदर कार्यक्रमाचे आभासी आयोजन करण्यात आले होते.
-
पोलंड/बायर्न म्युनिकचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोस्की आणि स्पेनची मिडफिल्डर अॅलेक्सिया पुटेलास यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला फुटबॉलमधील सर्वोत्तम फिफा खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विजेत्यांची संपूर्ण यादी
-
सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू: रॉबर्ट लेवांडोस्की (बायर्न म्युनिक, पोलंड)
-
सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू: अॅलेक्सिया पुटेलास (बार्सिलोना, स्पेन)
-
सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर: एडवर्ड मेंडी (चेल्सी, सेनेगल)
-
सर्वोत्कृष्ट फिफा महिला गोलकीपर: क्रिस्टियान एंडलर (पॅरिस सेंट-जर्मेन आणि लियॉन, चिली)
-
सर्वोत्तम फिफा पुरुष प्रशिक्षक: थॉमस टुचेल (चेल्सी, जर्मनी)
-
सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक: एम्मा हेस (चेल्सी, इंग्लंड)
-
FIFA फेअर प्ले पुरस्कार: डेन्मार्क राष्ट्रीय फुटबॉल संघ आणि वैद्यकीय कर्मचारी
-
उत्कृष्ट कारकीर्दीतील कामगिरीसाठी फिफा विशेष पुरस्कार: क्रिस्टीन सिंक्लेअर (महिला) आणि क्रिस्टियानो रोनाल्डो (पुरुष)