आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN)

IUCN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IUCN म्हणजेच International Union for Conservation of Nature अर्थात आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅण्ड, स्वित्झर्लंड हे IUCN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: झाँग झिंगसेंग हे सध्या IUCN च्या अध्यक्षपदावर आहेत.

  • महासंचालक: डॉ. ब्रुनो ओबर्ले हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • संस्थापक: ज्युलियन हक्सले हे IUCN चे संस्थापक आहेत.

  • स्थापना वर्ष: ५ ऑक्टोबर १९४८ रोजी IUCN ची स्थापना करण्यात आली होती.